
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवकांसाठी सुरू केलेली “माझा लाडका भाऊ योजना” (Maza Ladka Bhau Yojana) ही सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.
या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ रोजगाराची दिशा नव्हे तर प्रशिक्षणासह मानधन (Stipend) मिळण्याची संधी मिळते.
या लेखात आपण जाणून घेऊ या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते.
योजनेचा उद्देश
महाराष्ट्रातील अनेक युवक शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार आहेत.
अशा युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगारक्षम बनवणे — हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सरकारकडून निवड झालेल्या उमेदवारांना ६ महिन्यांचे ऑन-जॉब ट्रेनिंग देण्यात येते आणि त्या काळात त्यांना मासिक मानधन दिले जाते. करिता माझा लाडका भाऊ योजना (Maza Ladka Bhau Yojana) सादर केली आहे.
मानधन (Stipend) दर
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार मासिक मानधन दिले जाते —
| शैक्षणिक पात्रता | मासिक मानधन |
|---|---|
| १२वी पास युवक | ₹६,०००/- |
| ITI / Diploma धारक | ₹८,०००/- |
| पदवीधर / पदव्युत्तर | ₹१०,०००/- |
पात्रता (Eligibility Criteria)
माझा लाडका भाऊ योजना साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे –
- उमेदवार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
- वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
- उमेदवार बेरोजगार असावा (कोणत्याही सरकारी/खाजगी नोकरीत नसावा).
- किमान शिक्षण १२वी उत्तीर्ण असावे (ITI, Diploma, Graduate देखील पात्र).
- उमेदवाराकडे आधार कार्ड, बँक खाते, राहण्याचा दाखला, आणि शैक्षणिक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया (Online Application Process)
१. सर्वप्रथम महास्वयं पोर्टल https://rojgar.mahaswayam.gov.in येथे जा.
२. “Job Seeker Registration” या पर्यायावर क्लिक करा. किव्हा थेट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चे संकेत स्थळावर जाऊ शकता.
३. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड वापरून नोंदणी करा.
४. लॉगिन केल्यानंतर “माझा लाडका भाऊ योजना” किंवा “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना” हा पर्याय निवडा.
५. ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
६. अर्ज सबमिट करून त्याची स्थिती (Status) पोर्टलवर तपासा.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड
- शैक्षणिक प्रमाणपत्रे (Marksheet / Degree)
- राहण्याचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुकची प्रत
- आवास प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
योजनेचे फायदे
- राज्यातील युवकांना ऑन-जॉब प्रशिक्षणाची संधी
- मासिक मानधन (६ ते १० हजार रुपयांपर्यंत)
- प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र
- रोजगार संधी वाढण्यास मदत
- कौशल्यवृद्धी आणि आत्मनिर्भरता
निष्कर्ष
“माझा लाडका भाऊ योजना” ही महाराष्ट्र शासनाची एक नाविन्यपूर्ण योजना आहे जी युवकांना प्रशिक्षण, मानधन आणि रोजगाराच्या दिशेने पुढे जाण्याची सुवर्णसंधी देते.
जर तुम्ही पात्र असाल, तर आजच महास्वयं पोर्टलवर अर्ज करा आणि तुमच्या करिअरचा नवा प्रवास सुरू करा!
हे ही वाचा 👇👇




