
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली “लडका भाऊ योजना” (Ladka Bhau Yojana) ही एक अत्यंत उपयुक्त योजना आहे, यासाठी महाराष्ट्र सरकारने 5500 कोटींची तरतूद केली गेली आहे. ज्याद्वारे राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शैक्षणिक व सामाजिक सहाय्य दिले जाते. ही सरकारची खुप फायदेशीर व महत्वाकांक्षी योजना आहे. या अगोदर महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नावाने एक योजना सुरू केली होती, या योजनेला जोड योजना म्हणजे मुलांसाठी लाडका भाऊ योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश फक्त आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही, तर राज्यातील प्रत्येक मुलगा सक्षम, सुशिक्षित आणि आत्मनिर्भर बनावा हाच आहे.
सरकारने या योजनेद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, वंचित आणि मागास घटकांच्या मुलांना शिक्षणासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर पाहूया …
या लेखात आपण पाहूया — ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता आणि अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या सूचना.
Ladka Bhau Yojana म्हणजे काय?
“लडका भाऊ योजना” (Ladka Bhau Yojana) ही महाराष्ट्र शासनाची एक विशेष योजना आहे, जी विद्यार्थ्यांसाठी आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येते.
या योजनेतून विद्यार्थ्यांना शिक्षण, राहणीमान आणि इतर गरजांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
Ladka Bhau Yojana Registration Process – Step-by-Step मार्गदर्शन
Step 1: अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
👉 सर्वप्रथम https://mahaportalyojna.in किंवा संबंधित सरकारी संकेतस्थळ www.mahaswayam.gov.in उघडा. किव्हा थेट अर्ज करण्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in यावर सुद्धा क्लिक करु शकता.
(कधीकधी जिल्हानिहाय संकेतस्थळावरूनही नोंदणी सुरू असते.)
Step 2: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना “लडका भाऊ योजना” विभागावर क्लिक करा
- मुख्य पानावर “Ladka Bhau Yojana” साठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) किंवा “Social Welfare Schemes” (रोजगार) असा पर्याय दिसेल.
- त्या लिंकवर क्लिक करा.
- नवीन टॅब ओपेन होईल.

Step 3: नवीन अर्ज नोंदणी (New Registration) करा
- “New Registration” किंवा “Apply Online” वर क्लिक करा.
- तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी भरा.
- OTP द्वारे मोबाईल नंबरची पडताळणी करा.

Step 4: अर्ज फॉर्म भरा
- अर्ज फॉर्ममध्ये खालील माहिती काळजीपूर्वक भरा:
- अर्जदाराचे पूर्ण नाव
- पत्ता आणि जिल्हा
- शिक्षणाची माहिती
- वार्षिक उत्पन्न
- आधार क्रमांक आणि बँक खाते तपशील
Step 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
📎 आवश्यक कागदपत्रांची यादी:
- आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- शाळा / कॉलेज प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक पासबुकची झेरॉक्स
(सर्व फाइल्स PDF किंवा JPG स्वरूपात 200 KB पेक्षा कमी आकारात अपलोड कराव्यात.)

Step 6: सबमिट करून अर्जाची प्रत डाउनलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर “Submit” वर क्लिक करा.
- एकदा अर्ज सबमिट झाल्यावर त्याचा Acknowledgement Number / Application ID जतन करा.
- पुढील संदर्भासाठी अर्जाची PDF प्रत डाउनलोड करून ठेवा.
अर्ज करताना लक्षात ठेवावयाच्या महत्वाच्या सूचना
- अर्जात दिलेली सर्व माहिती खरी आणि तपासण्याजोगी असावी.
- चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी वेबसाइटवर Application Status तपासा.
- जिल्हा समाज कल्याण कार्यालयात आवश्यक असल्यास अर्जाची छायाप्रत जमा करावी.
मानधन किती मिळणार
- 12th पास 6000 रु
- आयटीआय/पदविका 8000 रु
- पदवीधर/पदवित्तर 10000 रु

Ladka Bhau Yojana Registration Last Date
सरकार दरवर्षी अर्ज भरण्याची मुदत निश्चित करते.
👉 2025 साठी नोंदणीची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल.
म्हणून अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे mahaportalyojna.in वर भेट द्या.
शाशन निर्णय/ योजना माहिती
संपर्क / Helpline
कोणत्याही तांत्रिक अडचणीसाठी संपर्क करा:
📧संपर्क : अधिक माहिती साठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उध्होजकता मार्गदर्शन केंद्र अथवा
☎️ Helpline: 1800 120 8040

निष्कर्ष
लडका भाऊ योजना ही युवक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे.
जर आपण पात्र असाल, तर आजच ऑनलाइन नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्या.
सरकारी मदतीचा योग्य उपयोग करण्यासाठी आणि ताज्या अपडेटसाठी mahaportalyojna.in ला भेट देत रहा.



