
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. पण बदलत्या हवामानामुळे वाढलेला उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता, पावसाचा तुटवडा आणि अतिवृष्टी यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आर्थिक अवघड परिस्थितीचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची आणि चर्चेत असलेली योजना म्हणजे PM-KISAN योजना व योजनेला पाठबळ देण्यासाठी राज्य सरकारने – NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana). सुरुवात केली.
NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करते, ज्यामुळे पिकांच्या खर्चात दिलासा मिळतो आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. केंद्र सरकारच्या PM-KISAN योजनेसोबत मिळणाऱ्या या राज्यस्तरीय मदतीमुळे शेतकऱ्यांना मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न मदत मिळण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे, ही योजना लहान, सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे.
शेतकरी जर योग्य पद्धतीने पात्र नोंदणी, E-KYC आणि कागदपत्रे पूर्ण ठेवतात, तर त्यांना या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. त्यामुळे NAMO शेतकरी योजना ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांना सुरक्षित आणि स्थिर शेती करण्यासाठीचा एक मजबूत आधारस्तंभ ठरते.
या NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) योजनेचा माध्यमातून शेतकर्यांना वार्षिक रु. 6000/- रुपये हे पैशे शेकार्यांना त्यांना त्यांच्या खात्यात तीन आठवड्यात वितरित करीत असते.
नमो शेतकरी योजना म्हणजे काय?
ही NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana2025) योजना केंद्राच्या सरकारच्या PM-KISAN योजनेप्रमाणेच चालवली जाते. जसे की केंद्र सरकार PM-KISAN योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक मदत देते, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्याला अतिरिक्त आर्थिक मदत देते.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून एकत्रित आर्थिक मदत दिली जाते.

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना चे फायदे
NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) या योजनेचा माध्यमाने शेतकरी अनेक प्रकारे फायदेशीर राहू शकते, शेतकरी त्याला एक आर्थिक पाठबळ देण्यासाठी हे एक सर्वोत्कृष्ट पाऊल आहे.
- पात्र शेतकऱ्यांना सरकारकडून थेट DBT पद्धतीने आर्थिक मदत जमा
- PM-KISAN योजनेचा लाभ घेत असलेल्या प्रत्यक याच अर्जात स्वतंत्र वेगळा लाभ
- PM-KISAN + NAMO शेतकरी योजना = दुहेरी लाभ
- शेतमाल उत्पादनात होणारा वाढता खर्च कमी करण्यास मदत
- पिक पेरणी, बियाणे, खत, औषधे खरेदीसाठी मोठी मदत
- शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेत वाढ
- योजने तर्फे केंद्र सरकार व राज्य सरकार मिळून वर्षभरात रु 12000/- रुपये चा लाभ दिला जातो.
नमो शेतकरी महासन्मान निधि योजना साठी पात्रता(Eligibility)
NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खालील अटी ची पूर्तता करत पात्र असणे फार गरजेचे आहे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- अर्जदाराचे नावे शेतजमीन नावावर असणे आवश्यक
- PM-KISAN मध्ये नाव नोंदलेले व सदर योजनेत सुद्धा पात्र लाभार्थी असणे आवश्यक
- संयुक्त खातेदार असल्यास त्यांच्या समान हक्कानुसार मदत
- अर्जदार सरकारी कर्मचारी व आयकरदार शेतकरी असल्यास अर्जदार अपात्र ठरेल
- अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो
नमो शेतकरी महासन्मान निधि योजना साठी कागदपत्रे (Documents)
NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) चा लाभ घेण्यासाठी शेतकरी आपला स्वतचा अर्ज स्वता करू शकतो मात्र अर्जदारकडे आवश्यक कागदपत्र असणे अत्यंत आवश्यक आहे. ती आवश्यक कागदपत्र खालील प्रमाणे सांगता येतील.
- अद्यावत आधार कार्ड
- सात बारा (7/12)
- आठ-अ (8-A)
- फार्मर आईडि
- शिधापत्रिका
- महत्वाचे
- आधार-बँक लिंक असणे आवश्यक
- आधार शी मोबाइल लिंक असावे जेणेकरून शेतकरीश पुढे अडचण जाणार नाही
- PM-Kisan योजनेमध्ये काही चुका असल्यास त्याला तत्काळ दुरुस्त करावी
- PM-Kisan योजनेत शेतकरी चे नाव नसल्यास या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही

नमो शेतकरी महासन्मान निधि योजना साठी नोंदणी प्रक्रिया
NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) चा लाभ घेण्यासाठी शेतकरी आपला स्वतचा अर्ज स्वता करू शकतो पण यासाठी प्रक्रिया कशी असायला पाहिजे हे आपण याठिकाणी पाहणार आहोत.
- अर्जदाराने स्वता PM-Kisan योजना पोर्टल नोंदणी करावी
- नोंदणीकृत लाभार्थीच्या पात्रतेची पडताळणी होणे आवश्यक
- अर्जदाराचे अर्ज PM-Kisan योजनेतून अर्ज पात्र होणे आवश्यक
- जिल्हा नोडल अधिकारी कडून अर्ज स्वीकृत होऊन पात्र होणे आवश्यक आहे
- अर्जदार PM-Kisan योजनेतून पात्र झाल्यास Namo शेतकरी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
👉 NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) हप्ता कधी म्हणजे कोणत्या महिन्यात येतो?
एप्रिल-जुलै, आगष्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अंदाजे या महिन्या दरम्यान दिली जाते.
👉 NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) योजनेतर्फे किती रुपये लाभार्थीस मिळते?
रु. 6000/- ही वार्षिक रक्कम दर चार महिन्याचे अंतराने तीन टप्प्यामध्ये दिली जाते.
👉 NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) या योजनेचा पैसा कुठे जमा होतो?
या योजने तर्फे मिळणारे पैसे हे DBT चे माध्यमाने समक्ष बँक खात्यात जमा केला जातो.
👉 NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) योजनेसाठी बँक-आधार अशी काही अट आहे का?
होय बँक खाते आधार शी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे.
👉 NAMO शेतकरी महासन्मान निधि योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) या योजनेसाठी शेती असणे आवश्यक आहे का?
होय नक्कीच यासाठी अर्जदारकडे शेती असणे आवश्यक आहे.








